मूर्तीजापुर (सुमित सोनोने):- मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. सुभाष दूध डेअरी चे संचालक व स्वामी विवेकानंद हिवरा आश्रम चे विश्वस्त प्रशांत हजारी यांचा भाजपा शहर युवा मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रशांत हजारी यांच्या विशेष दिनानिमित्त भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हर्षल साबळे यांनी संकट मोचन हनुमान यांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार केला मुर्तीजापुर मतदारसंघांमध्ये प्रशांत हजारे यांनी पुढे येऊन बेरोजगारांना रोजगार इ व शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय संदर्भात दुधाळ जानवर उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतीसोबत जोडधंदा उपलब्ध करून दिले आहे. तर मोठ्या प्रमाणात युवकांना सुद्धा या दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिले आहे म्हणून त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी मी आहे. असे मूर्तिजापूरचे नागरिक नेहमी बोलतात.