बाळापूर (डॉ चांद शेख)- दिवशेदिवस दुष्काळाची वाठती तिव्रता,पाणी टंचाई ची स्थिती तसेच पावसाचे अनियमीत आगमन या मुळे पर्यावरणचे संतुलन बिघडु लागले आहे.
शिवाय परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चारजनांच्या कुटूबांसाठी पुरेसा ठरेल एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. वाठत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्व पटू लागले आहेत. रोपण केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून जनजागृती करण्यासाठी ग्रामीण युवा बहुद्देशिय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा तथा ग्रामीण युवा संघटना अकोला महाराष्ट्र राज्य यांनी पुर्ण जिल्ह्यामध्ये या वर्षी जास्तीत जास्त वृक्षारोपण लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.तरी दिनांक ९\७\२०२० रोजी संस्थापक/अध्यक्ष मा.सतिशभाऊ देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. मोहम्मद जावेद शेख(बाळापूर शहराध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली बाळापुर येथे मन नदिच्या किनाऱ्याला लागुन ब्राह्मण वेस येथे वृक्षारोपण करण्यात आले.या वृक्षारोपण लागवडीची सुरुवात पातुर तालुक्यातील चौंढि या गावापासून सुरवात केली आहे.
कार्यक्रमाला सहभागी म्हणुन लाभलेले मा.मोहम्मद रियाज,मा.शेख अकिल,मा.सैयद फारुक,मा.शेख शारुख,मा.मोहम्मद रईस इ. कार्यकर्ते उपस्थित होते…