अकोला (प्रतिनिधी)- दिनांक १०.०६.२०२० रोजी तकारदार याने अँन्टी करप्शन ब्युरो,अकोला कार्यालयात येवुन तकार दिली की, त्यांचे स्वत:चे व त्यांचे अधिनस्थ असलेले कर्मचारी यांचे ७ वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व अरीअसचे प्रस्तावास मान्यता देण्याकरीता गैरअर्जदार कं.१ श्री. प्रविण लोखंडे, जिल्हा उप निबंधक,सहकारी संस्था, अकोला हे गैरअर्जदार कं.२ श्री.अमर शेठठी,असिसंटन्स कमिशनर,विक्रीकर विभाग, अकोला यांचे मार्फतीने ५ एरीएसचे निघणा-या रकमेच्या पन्नास टक्के रक्कमेची प्रथम मागणी केली व नंतर पाच लाख रुपये दयावे लागतील असे म्हणुन लाचेची मागणी करीत आहेत.
अँन्टी करप्शन ब्युरो कार्यालयात तकार प्राप्त झाल्यानंतर दि१०.६.२०२० रोजी पासुन ते दिनांक ४/७/२०२० रोजी पावेतो अँन्टी करप्शन ब्युरो च्या कार्यप्रणाली प्रमाणे पोलीस उप अधीक्षक श्री.एस.एस. मेमाणे यांनी तकारदार यांनाआरोपीची लाचेची मागणी आहे किंवा कसे या बाबत पडताळणी कारवाई केली असतां पडताळणी कार्यवाही दरम्याण गैरअर्जदार क १ श्री. प्रविण लोखंडे,जिल्हा उप निबंधक,सहकारी संस्था, अकोला यांची गैरअर्जदार कं.२ श्री.अमर शेठठी,असिसंटन्स कमिशनर,विक्रीकर विभाग, अकोला यांचे मार्फतीने तकारदार यांना त्यांचे तकारीत नमूद कामाचे मोबदल्यात लाचेची मागणी असल्याचे निष्पन्न झाले व त्यापैकी अर्धी रक्कम आता देण्या बाबत ठरले असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सापळा कार्यवाही आज दि ०९/०७/२०२० राजी आयोजीत करण्यात आला असतां सापळा कार्यवाही दरम्याण आरोपी कं.२ श्री.अमर शेठठी यांनी तकारदार यांचे कडून लाचेची रक्कम २,००,०००/- रुपये ही स्विकारली परंतु तकारदार यांनी दोन लाख आहेत असल्याचे सांगितल्याने जेंव्हा तुमच्या कडे पुर्ण रक्कम होईल तेंव्हा दयावी असे म्हणुन सदरची लाचेची रक्कम ही तकारदार यांना परत केली वरुन नमूद दोन्ही आरोपी यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. व पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस उप अधीक्षक, श्री.एस.एस.मेमाणे यांनी व त्यांचे सापळा पथक यांनी केलेली आहे. तकारदार यांचे प्रमाणेच नागरीकांनी भ्रष्टाचारा संबंधी तकार देण्यासाठी पूढे यावे असे आवाहन पोलीस उपअधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो अकोला यांनी केले आहे.