मूर्तीजापुर (सुमित सोनोने):- संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान व शाकंबरी प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने स्थानिक कार्यालयाच्या परिसरात दिव्यांग बांधवांना हस्ते वृक्षारोपण करून मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम पालकमंत्री बच्चु कडू यांच्या वाढदिवसाच्या पर्वावर आयोजित करण्यात आला होता.
संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान प्रमुख सतीश अग्रवाल यांचे पुढाकाराने आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाकंबरी प्रतिष्ठान कार्यालय येथे दिव्यांग बांधवांना मिष्ठान्न भोजन व त्यांचे असते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज व पुंडलिक महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने ज्येष्ठ पत्रकार दिलीप बाप्पू देशमुख प्राध्यापक अविनाश बेलाडकर, यांनी गुरुपौर्णिमेच्या पर्वावर व ना बच्चू कडू यांचे जीवन कार्य बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पुरुष रोपण करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान व त्याच्या प्रमुख सतीश अग्रवाल यांनी स्वीकारली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अनवर खान यांनी केले तर आभार दिलीप सरदार यांनी मानले.याप्रसंगी सुरेश काका देशमुख संजय नाईक, श्याम राऊत, सुरेश तायडे, संतोष वानखडे, राजकुमार नाचणे, बबलू यादव,अजय प्रभे, सुधीर कडू,गोपाल सोनवणे, सरिता शाम सुंदर,संगीत सानप, राजेंद्र भटकर,दिगाबंर भुगुल, शिवकुमार दुबे,अशोक कोकाटे गणेशपुरे,नूरखान अब्दुल खालिक मो शारिक कुरेशी,विशाल नाईक,मो रिजवान सिद्दीकी ,पंकज जामनिक, दानिश मनसुरी, दिनेश निमोदिया हर्ष अग्रवाल विशाल अग्रवाल ज्ञानेश टाले संतोष ठाकरे रवी खांडेकर उपस्थित होते. विविध सामाजिक उपक्रम द्वारे ना बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम एका सप्ताह भर राबवणे सुरू राहणार आहे.