मूर्तिजापुर (सुमित सोनोने):- मूर्तिजापुर शहर व तालुका कॉंग्रेस कमिटी च्या वतीने पेट्रोल डिजल दर वाढीच्या विरोधात केंद्र सरकार चा जाहिर निषेध करण्यात आला व राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन पाठविण्यात आले.
या वेळी अकोला जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष बबनराव डाबेराव, अकोला जिल्हा सरचिटणीस बंडु भाऊ डाखोरे,तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब बाजड,शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष दिनेशदूबे,सेवादल संघटन सचिव रोहित सोळंके,विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष मो शाहबोद्दीन,असंघटित कामगार कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बजरंगलाल जोशी , असंघटित कामगार कॉंग्रेस शहर अध्यक्ष दिपक खंडारे,अनुसूचित जाति तालुकाध्यक्ष गौतम उमाळे, शहर अध्यक्ष मिलिंद गावंडे,शहर महासचिव सोहेल शेख, सेवादल तालुकाध्यक्ष सुनील वानखडे,शहर अध्यक्ष अनंता पांडे,सोशल मीडिया शहर अध्यक्ष अमोल तातुरकर,राजू जोगदंड,आदि कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.