नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळी यांची मुंबई पोलिसांकडून आज चौकशी होणार आहे. ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन चित्रपटांसंदर्भात चौकशी केली जाणार आहे. या दोन चित्रपटांची ऑफर सुशांतला मिळाली होती. परंतु, सुशांतला हे चित्रपट करता आले नाहीत, यामागील काय कारण होतं, यासंदर्भात भन्साळींची विचारणा होऊ शकते.
संजय लीला भन्साळी सुशांत सिंह राजपूतला ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘रामलीला’ चित्रपटांमध्ये कास्ट करणार होते. परंतु, एका मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत झालेल्या कॉन्ट्रॅक्टमुळे सुशांतला हा चित्रपट मिळू शकला नाही. त्यामुळे सुशांत आणि प्रोडक्शन हाऊस यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला. कारण, सुशांतला हे चित्रपट करायचे होते. परंतु, प्रोडक्शन हाऊसने त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट केला नाही.
सत्य काय आहे, जाणून घेण्यासाठी पोलिस संजय लीला भन्साळींची चौकशी करणार आङे. सुशांत आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत २८ हून अधिक लोकांची चौकशी करून जबाब नोंदवण्यात आला आहे.