अकोला: जिल्हा माहिती कार्यालय,अकोला
कोरोना अलर्ट
आज शनिवार दि.६ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ +सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१०८
पॉझिटीव्ह-३०
निगेटीव्ह-७८
अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व सहा पुरुष आहेत. त्यात सिंधी कॅम्प येथील दोघे तर उर्वरित गंगानगर जुनेशहर, गुलजार पुरा, सोनटक्के प्लॉट, जेतवननगर खदान, भारती प्लॉट, गणेशनगर, व्यंकटेशनगर, जयहिंद चौक येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत.
दरम्यान आज दुपारी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यातील एक जण ७० वर्षीय पुरुष असून हा रुग्ण गुलजार पुरा येथील रहिवासी आहे. हा रुग्ण दि.३ रोजी दाखल झाला होता. आज उपचार घेतांना मयत झाला. तर अन्य रुग्ण ही ४० वर्षीय महिला असून ती शरीफ नगर जुने शहर येथील रहिवासी आहे. ही महिला दि.२७ मे रोजी दाखल झाली होती. तिचा आज दुपारून उपचार घेतांना मृत्यू झाला.
तसेच आज दुपारनंतर २६ जणांना डिस्चार्ज दिला. त्यातील आठ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित १८ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-७५६
मयत-३६(३५+१),डिस्चार्ज-५३१
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१८९
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)