अकोला,दि.२१ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १७३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४० अहवाल निगेटीव्ह तर ३३ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. काल (दि.२०) आणखी २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर काल रात्रीच एका जणाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ३४१ झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात १२९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ३२७१ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३१७४ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २८३३ अहवाल निगेटीव्ह तर ३४१ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ९७ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ३२७१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०२३, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३१७४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २९२६ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २८३३ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३४१ आहेत. तर आजअखेर ९७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज ३३ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात १७३ अहवाल प्राप्त झाले. त्यात ३३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. सकाळी प्राप्त अहवालात १६ जण पॉझिटीव्ह आढळले. त्यात नऊ पुरुष तर सात महिला आहेत. त्यात रेल्वे कॉलनी जठारपेठ येथील तीन जण, फिरदौस कॉलनी येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, नायगाव येथील दोन तर रजतपुरा, ज्योतीनगर सिव्हिल लाईन्स, न्यू राधाकिसन प्लॉट, गोरक्षण रोड, सोनटक्के प्लॉट, पुरपिडीत कॉलनी अकोट फैल, लक्ष्मीनगर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.
तर सायंकाळी प्राप्त अहवालात १७ जण पॉझिटीव्ह आढळले. सायंकाळी प्राप्त १७ अहवालात १० पुरुष तर सात महिला आहेत. त्यात सोनटक्के प्लॉट जुने शहर येथील तीन जण, जोगळेकर प्लॉट डाबकीरोड येथील चार जण, तर रेवतीनगर बाळापुरनाका डाबकीरोड, देशमुख फैल, डाबकीरोड, अकोट फैल, सावंतवाडी, सिव्हील लाईन्स, जुने शहर, लकडगंज रामदास पेठ, मोमीनपुरा, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी एक जण आहेत.
एक जण मयत
दरम्यान काल (दि.२०) भिमचौक अकोट फैल येथील रहिवासी असलेला ६८ वर्षीय रुग्ण उपचार घेतांना मयत झाला आहे. हा रुग्ण दि.१८ रोजी दाखल झाला होता.
२४ जणांना डिस्चार्ज
तसेच काल (दि.२०) रात्री २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील २१ जण कोवीड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत. तर तिघांना घरी सोडण्यात आले आहे. हे रुग्ण अकोली गितानगर-चार, आंबेडकरनगर- चार, भिमचौक अकोट फैल-तीन, अकोट फैल भवानी पेठ-दोन, तर फिरदौस कॉलनी, डाबकी रोड, अकोट फैल, खोलेश्वर, रंगारहट्टी बाळापूर, सुभाष चौक, नेहरु नगर, खदान, सिव्हिल लाईन, खैर मोहम्मद प्लॉट, रामदास पेठ पोलीस क्वार्टर येथिल प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
१२९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ३४१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २१ जण (एक आत्महत्या व २० कोरोनामुळे) मयत आहेत. काल बुधवार दि.२० रोजी २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १९१ झाली आहे. तर सद्यस्थितीत १२९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.