अकोला: जिल्हा माहिती कार्यालय,अकोला
कोरोना अलर्ट
आज मंगळवार दि.१९ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२३२
पॉझिटीव्ह-१८
निगेटीव्ह-२१४
अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी प्राप्त अहवालात एक व्यक्ती पॉझिटीव्ह आली असून ही व्यक्ती चिराणीया कंपाऊंड रामदास पेठ येथील ६८ वर्षीय व्यक्ती आहे. ही व्यक्ती दि.१६ रोजी दाखल झाली होती तर उपचारादरम्यान काल (सोमवार दि.१८ ) मृत्यू झाला. त्यांचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला.
दरम्यान आज आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण ६२ वर्षीय व्यक्ती असून सावंतवाडी रणपिसेनगर येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती दि.१५ रोजी दाखल झाला होता. त्यांचा अहवाल दि.१७ रोजी पॉझिटीव्ह आला होता. उपचार सुरु असतांना आज ही व्यक्ती मयत झाली.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२७९
मयत-२०(१९+१),डिस्चार्ज-१४४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११५
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)