वाडेगाव (राजकुमार चिंचोळकर)- कृषी अधिकारी कार्यालय बाळापूर यांच्या वतीने वाडेगाव येथील कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणी पुर्व विविध विषयांवर मार्गदर्शन करन्यात आले आहे. यामध्ये बियाणे उगवन क्षमता तपासनी बीजप्रक्रिया तसेच बियाणे विकत घेताना घ्यावी लागणारी काळजी बाबतीत सविस्तर पणे सुरक्षित अंतर ठेवून शेतकऱ्यांना कृषी सहायक यु एम धुमाळे व शेगोकार यांनी केशवराव सरप यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण दिले.
तसेच गतवर्षी सोयाबीन काढनीच्या कालावधीत परतीच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम झाल्यामुळे बाजारात बियाणे तुटवडा लक्षात घेता. गतवर्षीच्या बियाणेचे उगवन क्षमता तपासनी प्रात्याक्षिक त्यावेळी करून दाखविले. सदर प्रशिक्षण मार्गदर्शनाला शेतकरी कृषी सखी वंदना ताकवाले मंगला लहाने राधा जंजाळ माया जंजाळ उषा जंजाळ सरला दाभाडे लक्ष्मीबाई कारंजकर शीतल कळंब तसेच रामेश्वर सोनटक्के निखिल कंडारकर श्रीराम लांडे दत्ताभाऊ हुसेन सहदेव सराफ भटकर आदींची उपस्थिती होती.
अधिक वाचा: सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार