अकोट ( शिवा मगर ): अकोट तालुक्यातील ग्राम कालवाडी गावाचे नाव आदर्श गाव म्हणून नेहमीच चर्चेत असते आताच कठीण परिस्थितीत या गावातील युवक प्रविण अशोक रावनकार यांच्या कुटुंबातील लोकानी आदर्श दाखवलाय सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत अत्यंत साध्या पध्दतीने विवाह पार पाडला.
संपुर्ण जगात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे त्यामुळे भारतात आपत्ती व्यवस्थापन कायदा व संचारबंदी मध्ये लग्न समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने स्वतःच्या घरीच साजरा करण्याचे शासनाचे आदेश आहेत.
त्यामुळे आरती राजेन्द्र डोसे रा.जस्तंगाव व प्रविण अशोक रावनकार रा.कालवडी यांचा 12मे रोजी ठरलेला विवाह आदेशानुसार, नियमांचे, मास्क लावून,सोशल डिस्टनसिंग पाळून आनंदात कालवडी येथे विवाह संपन्न झाला.