• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

शेतकरी गटांनी पोहोचविल्या कृषि निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत

Team by Team
May 5, 2020
in अकोला, Featured, शेती
Reading Time: 1 min read
79 0
0
group of farmers
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.५- कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन गर्दी करावी लागू नये, म्हणून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत कृषि निविष्ठा( बियाणे, खते, किटकनाशके इ.) पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या या निविष्ठ थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यास शेतकरी गटांनी सुरुवात केली असून जिल्ह्यात ठिकठिकाणी कृषि निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविल्या जात आहेत. आत्मा प्रकल्पा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या शेतकरी गटांमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

बार्शी टाकळी तालुकाः- तालुका कृषी अधिकारी कार्यालय बार्शीटाकळी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा बार्शीटाकळी अंतर्गत शेतकऱ्याच्या बांधावर खते/ बियाणे/ कीटकनाशके हा उपक्रम राबवित आज मौजे कान्हेरी,ता बार्शीटाकळी जिल्हा अकोला येथील शेतकऱ्यांना निविष्ठा पोहच करण्यात आल्या व्यक्तिगत अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करीत गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत माऊली कृषी सेवा केंद्र बार्शीटाकळी येथून ५० बॅग सोयाबीन बियाणे,३० बॅग खते १५ लिटर कीटकनाशक, २० लिटर तणनाशक या कृषी निविष्ठांची खरेदी केली.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोला तालुकाः- अकोला तालुक्यातील मौजे बहिरखेड,खरप, गोणापुर, पळसो,दापुरा, कासली,दोनवाडा, वडद येथील शेतकरी गटांनी आपातापा येथुन १२३५ बॅग सोयाबीन वाण JS३३५ बियाणे, MOP, १०;२६;२६ , DAP , SSP, UREA, १२.३२.१६ एकुण ९०८७ खतांच्या बॅग खरेदी करुन पोहच करून देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी गटाकडे नोंदणी केल्यानुसार शेतकऱ्यांना निविष्ठा कोणत्याही प्रकारची वाहतूक भाडे,हमाली नघेता थेट गावात पोहच करण्यात आल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ, उपविभागीय कृषि अधिकारी कुळकर्णी, तालुका कृषी अधिकारी प्रधान, मंडळ कृषि अधिकारी फुलारी, तालुका आत्मा अध्यक्ष भरत काळमेघ, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्हि.एम.शेगोकार, श्रीमती ए.पी.पेटे,कृषी सहा.अनील वानखडे व शेतकरी गटाचे अध्यक्ष उपस्थित होते.

तेल्हारा तालुकाः- गणेश कृषी सेवा केंद्र तेल्हारा येथून मौजे शेरी वडनेर व शेरी बुद्रुक येथे दोन शेतकरी गटांना एकूण ५८ बॅग खताचा पुरवठा त्याच्या गावात त्यांच्या बांधापर्यंत करण्यात आला. या उपक्रमामुळे शासनाने ठरवून दिलेल्या रास्त दरातच कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही व कोणाचा प्रादुर्भाव टाळण्यास सुद्धा मदत होईल त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.

अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार

Tags: अकोलाउपविभागीय कृषि अधिकारी कुळकर्णीमोहन वाघ
Previous Post

लग्न समारंभ साधेपणाने करण्यास परवानगी ; उपविभागीय अधिकारी ‘परवानगी अधिकारी’ म्हणून प्राधीकृत

Next Post

बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी ९७२ ई-परवानगी प्रदान

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
e-pass

बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी ९७२ ई-परवानगी प्रदान

wine shop akola alcohol wine

अकोला मनपा क्षेत्र वगळून मद्यविक्रीस बुधवार (दि.६)पासून परवानगी; सुचना व अटी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.