वाडेगाव(डॉ चांद शेख)-वाडेगाव व परीसरात रब्बी हंगामातील कांदा पीक परीपुर्णतेकडे असले तरी बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे परीसरात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे तसेच गतवर्षीच्या पावसाळ्यामध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पीकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती मात्र पडलेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट निर्माण झालचे चित्र पाहायला मिळते तर कांदा पीकांच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे शेतीच्या पेरणी चे नीयोजन ठरत असते मात्र कोरोना व्हायरस संसर्ग बाबतीत लॅकडाउन असल्याचे शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे दिसून येत आहे.