अकोला : भारत देशावर नव्हे तर पूर्ण जगावर सध्या फार मोठे संकट आलेले आहे ते संकट म्हणजे करोना गरिबांचे हाल होत आहेत अशा परिस्थितीमध्ये च सर्व कडून मदत सुरू आहे.
अशा परिस्थितीमध्ये ग्राम करतवाडी रेल्वे येथील मजुरी नसलेला तरुण दिनेश घराच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या गावातील शेतातील इंधन आणण्याकरिता गेला व त्याच्या डोळ्यात इंधनाचा काटा रुतला परिस्थिती हलाखीची असताना व बाहेर लॉकडाऊ न गंभीर परिस्थिती असताना आपल्याला कोण मदत करेल व आपण कुठे जायचे या भीतीपोटी सदरचा तरुण हा घरीच थांबला परंतु संकट फार मोठे होते डोळ्याची बुबुळे बाहेर निघाले होते अशा वेळेस गावातील सरपंच श्री सुदर्शन किरडे गावातील गरजूंना अन्नधान्याचे वाटप करत होते ज्यावेळेस सरपंच या गरजू लोकांपर्यंत गेली त्यांना माहीत पडले यांच्या डोळ्याला मार लागलेला आहे व परिस्थिती हालाखीची आहे अशा वेळेस उपचार कसा करायचा उपचाराला लागणारा खर्च कसा भागवायचा या विचाराला न डगमगता त्यांनी अकोला गाठले व उपचाराचा पर्याय शोधू लागले डॉक्टर कडून विचारणा केली 30 ते 40 हजार रुपये खर्च अपेक्षित होता एवढा खर्च आणणार कुठून हा सुद्धा प्रश्न होता त्यांत या लॉकडाउ न च्या काळात आपणास कोण मदत करेल अशा परिस्थितीमध्ये त्यांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व गावकरी मित्र मंडळींना आवाहन केले गेले आणि त्यामध्ये मोलाची कामगिरी पार पाडली ती जय गजानन माऊली व्हॉटसअप ग्रुपने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ आपल्या फोनच्या माध्यमातून पेशंट असलेला दिनेश याचे खात्यामध्ये आपल्या परीने मदत केली व बघता बघता ऑपरेशनची व्यवस्था झाली डॉक्टरांनी सुद्धा या गरजांची गरज ओळखली त्यांनीसुद्धा मदत करत ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले जो तरुण परिस्थितीनुसार अंध झाला असता त्याला दृष्टी देण्याचे काम एकजुटीने सकारात्मक विचाराने व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून तरुण मंडळींनी करून दाखवले त्यांच्या कार्यास सलाम