महाराष्ट्रातील कोरोना ग्रस्त जिल्हाचे झोनिंग दिशाभूल करणारे असून जास्त बाधित व मृत संख्या असलेला जिल्हा ऑरेंज तर कमी बाधित व कमी मृत्यू असलेला जिल्हा रेड झोनमध्ये दिसत असल्याने नागरिक गोंधळात असून आरोग्य विभाग प्रशासनाने ह्या तफावतीचा नेमका खुलासा करावा अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
अकोला मध्ये ३२ जण कोरोना पॉजिटिव आढळून आले.त्यात चार जण मृत्यू पावले तर ११ जणांना घरी सोडले असून १७ जण उपचार घेत आहेत. त्यातुलनेत अमरावती जिल्ह्यातील कोरोना पॉजिटिव ४३ असून ७ जण मृत्यू पावले आहेत. अशी आकडेवारी असताना कमी बाधित व कमी मृत्यू दर असलेला अकोला जिल्हा रेड झोनमध्ये तर जास्त बाधित व जास्त मृत्यू दर असलेला अमरावती जिल्हा ऑरेंज झोनमध्ये दाखविला जात आहे. अकोला पेक्षा जास्त रूग्ण बुलढाणा जिल्ह्यात आहेत.तरीही तो जिल्हा देखील ऑरेंज झोनमध्ये दिसतो. चंद्रपुरात एकही रुग्ण नसताना तो जिल्हा देखील ऑरेंज झोनमध्ये दाखविला आहे.
अकोला रेड झोनमध्ये असणे, अमरावती, बुलढाण्यात जास्त केसेस असताना ते रेड मध्ये न टाकता, ऑरेंजमध्ये टाकणे हा नेमका गोंधळ काय आहे याचा तातडीने खुलासा होने गरजेचे आहे. झोनिंगचे निकष व त्याची प्रक्रिया जनहितार्थ जाहिर करून ह्या झोनिंगमधली तफावत का आली याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी,अशीही मागणी वंचित बहूजन आघाडीने केली आहे.
अधिक वाचा: मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटला;निवडणूक आयोगाची परवानगी