महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाली. त्याचबरोबर आज जागतिक कामगार दिन आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी बलिदान देणाऱ्यांना मानाचा मुजरा करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई आपल्याला अशीच मिळालेली नाही, बलिदान देऊन मिळाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.