अकोला: कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊन सुरू होऊन जवळपास एक महिना झाला आहे. त्यामुळे जीवनावश्यक दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद आहे परिणामी मोठ्या व्यवसायंकाना फटका बसण्या सोबतच हातावर पोट असणार्या लघु व्यवसायंकाना फटका बसला आहे. त्यामुळे उपासमारीचे संकट त्यांच्यावर ओढवले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या निर्देशनावरून संचारबंदीचे काटेकोर अंमलबजावणी सुरु आहे. श्रीमंत मंडळी, नोकरदार, मध्यमवर्गीय नागरिक यांनी एक महिना घरी राहून आरामात जीवन जगता येईल एवढा किराणा व साहित्य त्यांच्या घरी आहे.
मात्र ज्यांचे पोट काही काम धंदा केल्या शिवाय भरत नाहीत, हात मजुरी करावी लागते अशा कामगार व लघु व्यवसायिकांना आता जगणे कठीण झाले आहे. शहरातील बस स्टँड चौक, बाजार, व रोडवर टाकून छोटा-मोठा व्यवसाय करणारी मंडळी त्यात चांभार, चप्पल विक्रेते, कटलरीवाले, चहा टपरी चालविणारे, गॅस दुरुस्ती करणारे व विक्रेते, पेंटर सायकल दुरुस्ती करणारे, हात गाडीवर कपडे विकणारे, फेरीवाले आदींचे दुकानदारी महिनाभरापासून बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची संकट ओढवले आहे. लॉकडाऊनचा लघु व्यासायंकाना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
अधिक वाचा: अकोटातील शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टराची गैरहजेरी, रुग्णालय सोडले वाऱ्यावर