अकोला- जिल्ह्यातील खाजगी दवाखाने सुरु ठेवून त्यात रुग्णांना सेवा मिळावी या हेतूने खाजगी दवाखाने सुरु ठेवण्याबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत. तथापी या सेवा सुरु आहेत किंवा नाही त्यासाठी विशेष पथके नेमून खाजगी दवाखाने, क्लिनिक, हॉस्पिटलची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले आहेत.
या संदर्भात आज एका बैठकीत जिल्हाधिकारी पापळकर यांनी निर्देश दिले. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
कोवीड व्यतिरिक्त अन्य आजारांसाठी रुग्णांना आवश्यक असणाऱ्या उपचार सुविधा उपलब्ध रहाव्या यासाठी खाजगी दवाखाने, हॉस्पिटल्स सुरु रहावीत असे आवाहन यावेळी करण्यात आले. रुग्णांना अन्य आजार व वैद्यकीय सुविधा मिळायल्या हव्यात याकडे अधिक लक्ष द्यावे यासाठी खाजगी दवाखाने तपासणी साठी जिल्हा शल्य चिकित्सकाच्या नेतृत्वात तपासणी पथक नेमावे, या पथकाने या दवाखान्यांची पाहणी करावी व रुग्णांना सेवा देणाऱ्या दवाखान्यांवर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले.
अधिक वाचा: अकोटातील शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टराची गैरहजेरी, रुग्णालय सोडले वाऱ्यावर