वाडेगांव (प्रतिनिधी डॉ. शेख चांद): वाडेगांव येथील बाळापूर रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समीती समोरील पाटील डीपी, तामशी बीट वरील तारांवरील कोटींग पुर्ण खराब झाली असून काही तार जिर्ण झालेले आहे. यामुळे एखादया शेतकऱ्याचा किंवा मजुराचा जिव जाऊ शकतो. तरीही संबंधीत विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे शेतकरी वर्ग सांगीत आहे. दरोज या डी पी वरील फ्युज उडत असून ते दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी तसेच शेतकरी यांना आपला जिव धोक्यात टाकावा लागत आहे. तसेच जमीनी पासून खुल्या तारांचे अंतर फक्त दोन ते अडीच फुट असून याला एखादा जनावर पण शॉक लागून जीव जाऊ शकतो तरी संबंधीत विभागाने तात्काळ लक्ष देऊन डिपी दुरुस्त करावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागनी आहे.
शेतकऱ्यांना दिवसाची लाईन देण्यात यावी कारण लॉक डावून मध्ये सर्व मिल , कंपन्या बंद असून आता तरी आटवडयाचे पुर्ण दिवस दिवसाची लाईन द्यावी अशी मागणी सर्व शेतकरी करीत आहे.
अधिक वाचा: अकोटातील शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टराची गैरहजेरी, रुग्णालय सोडले वाऱ्यावर