अकोला- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर जिल्हा कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांची गर्दी होऊन संसर्गाची भिती वाढू नये म्हणून जिल्हा कारागृहाला रेल्वेस्टेशन जवळील शासकीय विश्रामगृह येथे अतिरिक्त जागा तात्पुरते कारागृह तयार करण्यासाठी देण्यात आली असून तसे आदेश आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
जिल्हा कारागृहात दाखल बंदी जनांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशान्वये जिल्हा कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या बंदीजनांना १५ दिवस कालावधीसाठी या तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या कारागृहात विलगीकरण करुन ठेवेण्यात. त्यामुळे ही जुन्या शासकीय विश्रामगृहाची इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने तापुरते कारागृह स्थापन करण्यासाठी कारागृह अधिक्षक यांच्या ताब्यात द्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने आवश्यक सोई सुविधांची पूर्तता या इमारतीत करावी. कारागृह अधिक्षकांनी ही इमारत ताब्यात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने व दैनंदिन कामकाजाच्या दृष्टिने पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
अधिक वाचा: पातूर येथे कोरोना पथकाची गुडलक स्वीट अँड जनरल वर कारवाई.