अकोट (प्रतिनिधी शिवा मगर)- उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्या बैठकी मधील चर्चेनुसार अकोट शहरात शिवाजी चौक ते अकोला नाका या मार्गावर दररोज भरणाऱ्या भाजी बाजाराच्या ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 25 एप्रिलपासून भरणारा भाजी बाजार हा शिवाजी चौक ते बस स्टँड मार्गावर भरण्याबाबत तसेच बाजार भरतांना सामाजिक अंतर ठेवून दुकाने लावण्याबाबत दुकानदारांना सूचित करावे.
तसेच भाजी विक्रेत्यांना दुकानाची सामाजिक अंतर ठेवण्याच्या दृष्टीने मांडणी करून देण्याची सुद्धा कारवाई करण्याबाबत पत्र नगरपरिषद यांना दिले. यापूर्वी अकोट शहरात शिवाजी चौक ते अकोला नाका या मार्गावर दररोज भाजी बाजार भरविण्यात येत होता. बाजार भरवण्याच्या वेळेमध्ये नागरिकांची वाहनामुळे गर्दी होऊ नये म्हणून पोलीस विभागामार्फत बाजारात येण्याच्या मुख्य मार्गावर बॅरिगेट लावण्यात आले होते.
त्यामुळे जड वाहन रुग्णवाहिका तसेच आगीवर नियंत्रण ठेवण्याकरिता अग्निशामक दलाच्या वाहनांना येण्या जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे शेतमालाच्या खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे अकोट शहरात येणाऱ्या जड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे बाजारात येण्यावर जाण्याच्या मार्गावर नमूद वाहन यापैकी एखादे वाहन रस्ता न मिळाल्याने थांबून राहिल्यास वाहनाच्या मागे इतर वाहने थांबून रस्त्यावरील वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता होती, त्यावरून नगरपरिषद पथकाने बाजारातील दुकानदारांना बाजार भरण्याच्या जागेत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या जागा बदलामुळे अकोला मुख्य मार्गावरील बँक कृषी खाद्य व साहित्य विक्रेते व इतर दुकानदारांना दिलासा मिळाला.
अधिक वाचा: पातूर येथे कोरोना पथकाची गुडलक स्वीट अँड जनरल वर कारवाई.