तेल्हारा- सद्या संपुर्ण जग कोरोनाशी लढत आहे मात्र ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना नगर परिषद प्रशासनाशी पाण्यासाठी लढाव लागत आहे. शहरातील प्रभाग ६ मध्ये ठेकेदाराच्या मनमानी अशा कारभाराने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फोडल्याने नागरिकांसमोर पाण्याचे संकट उभे ठाकले आहे.
तेल्हारा येथील प्रभाग ६ मधील हनुमान मंदिराजवळील नाल्याचे काम सुरू आहे. नाल्याचे खोदकामामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेलेली असल्याने काम सुरू असताना पाईपलाईन फुटावी नाही म्हणून येथील नागरिकांनी याबाबत ठेकेदाराला अवगत केले होते मात्र ठेकेदार यांनी मनमानी करून सदर पाईपलाईन फोडली असा आरोप येथील नागरीक करीत आहेत. न प प्रशासन योग्य उत्तर देत नसल्याने तसेच पिण्याच्या पाण्याची योग्य सोय होत नसल्याने अखेर आज प्रभाग ६ मधील नागरिकांनी न प मुख्याधिकारी यांच्या दालनात धाव घेऊन निवेदन सादर करून दूषित पाणी पुरवठा बंद करून पाईपलाईन चे काम लवकर करून पाण्याच्या संकटातून काढावे अशी मागणी केली. यावेळी शेकडो नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले. फुटलेल्या पाईपलाईन चे काम करण्यात आले मात्र ते योग्य प्रकारे न केल्याने दूषित गढूळ आरोग्याला घातक असा पुरवठा होत आहे मात्र ते कुठल्याच कामात उपयोगात येत नसल्याने त्वरित स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जावा असे यावेळी येथील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितले
टँकरने पाणी पुरवठा, सोशल डिस्टस्टिंग ची ऐशी तैशी
प्रभाग सहा मध्ये नेहमीच कृत्रिम पाण्याचा तुटवडा जाणवतो कारण जुनाट झालेल्या पाईपलाईन ब्लॉकेज पाण्याचा प्रवाह यामुळे पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे प्रभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे अशातच कोरोनाच्या धर्तीवर शासनाने कलम १४४ लागू करण्यात आली मात्र पाणी मिळत नसल्याने नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत त्यात नगर पालिकेकडून पाण्याचा टँकर पाठवला जातो मात्र टँकर येताच नागरिक एकाच वेळी गर्दी करून सोशल डिस्टस्टिंग चा फज्जा उडवताना दिसत आहेत कारण पाणी नसल्याने मोठे संकट येथील नागरिकांनवर येऊन ठेपले आहे. नगर पालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन कोरोनाच्या धर्तीवर योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
अधिक वाचा: गावठी दारू भट्टीवर भरारी पथका कडुन कारवाई