वाडेगाव(प्रतिनिधी डॉ शेख चांद)- पातुर तालुक्यातील हिगना शेतशिवारात राज्य उत्पादन शुल्क चे भरारी पथका कडुन गावठी दारू भट्टीवर कारवाई करण्यात आली आहे.
या मध्ये मीळालेल्या माहितीनुसार उपरोक्त शेतशीवारात दादाराव वामनराव अवचार याचे शेतात साडेतीनशे लीटर मोहाचा सडवा व दहा लिटर गावठी दारू हस्तगत करण्यात आली. किंमत आठ हजार पाचशे पंचाहत्तर रुपये नष्ट करण्यात आली. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिस अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक क्षिरसागर संतोष देवळे, अमर इंगळे यांनी कारवाई केली व आरोपीवर मुंबई दारू बंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे.