तेल्हारा (प्रतिनिधी विशाल नांदोकार): सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला असता जीवाच्या आकांतापोटी व हाताला काम नसल्याने नाईलाजास्तव लोणावळ्यावरून मध्यप्रदेश मधील धरणी येथील मजुरांनी केला चक्क 15 दिवसांत साडे पाचशे किलोमीटरचा प्रवास.
देशभरात कोराना व्हायरसचे महाभयंकर संकट ओढावल्याने नागरिकांना काळजी घेण्याच आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाबाधितांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढतच आहे. असे असूनही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी सर्वच व्यवसाय बंद असल्याने हातावर पोट असलेले कामगार हवालदिल झाले असून हाताला काम नसल्याने कामगार आपल्या गावी घरी परतण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने त्यांना घरापर्यंत पायी चालत पुण्यावरून मध्यप्रदेशकडे प्रवास करावा लागत आहे.
तेल्हारा शहरात आज मजूर पायी प्रवास करून दमलेल्या अस्वस्थेत आमचे प्रतिनिधी विशाल नांदोकार यांना दिसले त्यांनी त्यांची चौकशी केली असता ते मजूर लोणावळा येथून 8 एप्रिल म्हणजेच 15 दिवसांपूर्वी निघाले असल्याचे समजले. म्हणजेच अवघ्या 15 दिवसात ५४३ किलोमीटरचा प्रवास करून हे मजूर मध्यप्रदेश मधील धरणी येथे जात असल्याचे समजले. म्हणजे अक्षरशः अंगावर शहरा आणणारा हा प्रसंग होता. जीवाच्या आकांतापोटी व हाताला काम नसल्याने चक्क जवळपास साडे पाचशे किलीमितर पायी प्रवास म्हणजे अजबच. परंतु, सर सलामत तो पगडी पचास ह्या म्हणीप्रमाणे जीव वाचला तर पैसा कामावूच असे त्यांचे म्हणने आले. त्यांची वैद्यकीय तपासणी झाली असल्याचे त्यांच्या हातावर दिलेले छिक्यांवरून कडत होते.