पातुर (सुनील गाडगे) : पालघर येथील दिनांक 16 एप्रिल 2020 रोजी श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत कल्पवृक्ष गिरी, (वय 70), सुशील गिरी (वय 35) व कार ड्रायव्हर निलेश तेलगडे रा. मुंबई हे त्यांचे गुरु महंत राम गिरी यांच्या अंत्यविधीसाठी मुंबई वरून सुरत, गुजरातकडे जाण्यासाठी निघाले असता कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गडचिंचले गावामध्ये अज्ञात लोकांनी त्यांची गाडी पलटवून संतांना लाथा बुक्क्यांनी जमावाने हतबल पोलिसांच्या समोर पोलिसांच्या गाडीची तोडफोड करून संतांना व ड्रायव्हरला गाडी बाहेर काडून लाठी, दगड, लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने मारत त्यांचा जीव घेतला. या सर्व घटने बद्दल येथील तहसीलदार यांना श्रीराम सेनेचे राष्टीय प्रमुख रणजित जी सफेलकर जिल्हा प्रमुख ऍंड मोरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ संघटनमंत्री मंगेश गाडगे यांच्या नेतृत्वात एक निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त केला.
सदर घटनेबद्ल अतिशय रोष पसरला आहे. सदर घटनेचा शासनाचे वतीने योग्य तपास करून संधीत गुन्हेगाराना फाशी शिक्षा होणे बाबत कार्यवाही करण्यात यावी,अशा स्वरूपाचे निवेदन निवासी नायब तहसीलदार सै. ऐहेसाणोद्दीन यांना दिले असून या निवेदनावर मंगेश गाडगे, सचिन बारोकार , स्वप्नील इंगळे,आशिष वानखडे , अंकित पाटील, महेंद्र फलके , योगेश इंगळे ,पवन तायडे, यांच्या सह्या आहेत.