मानोरा (जि.वाशीम): कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून नागरीकानी कोणीही घरा बाहेर पडता कामानये यासाठी लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले घरात बसून काय करायचे असा प्रश्न पडल्यावर तालुक्यातील कारखेडा येथील पती पत्नीने घराच्या अंगणात चक्क एकविस दिवसात विहीरच खोदून टाकली.
हाताला काम पोटाला भाकर कोणत्याही परिस्थितीत मिळू शकते याचे जीवंत उदाहरण आहे. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या विश्रांतीचा फायदा कसा घ्यावा, रिकाम्या वेळचे नियोजन व या संधीच सोन या दांपत्याने केलं आकारखेडा येथे अठ्ठावीस गावे पाणी पुरवठा योजना चिरकुटा धारणावरून कार्यन्वीत आहेत. तर राष्टीय महामार्गचे आतापर्यंत काम सुरू होते. परंतु, लॉकडाऊनमुळे कामे बंद आहेत. संचारबंदी असल्यामुळे पाण्यासाठी बाहेर जाण्याची भीती, बाहेर गेले तर पोलिस. मग करायचे काय विवेचनेने ञस्त झालेल्या गजानन नारायणराव पकमोडे व पत्नी पुष्पा गजानन पकमोडे या दांपत्याने चक्क एकविस दिवसाच्या लाॅकडाऊनमध्ये पंचविस फुट विहीर खोदून काढली.
या विहीरीला गोड पाणी लागले आहे. गजानन पकमोडे म्हणतो व्यवसायाने गवंडी काम करत असल्यामुळे सतत कामे राहायची. परंतु लाॅकडाऊनमुळे घरातच बसुन राहून माझे व माझ्या कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवले व जीवनभराचा पाण्याचा प्रश्न सोडल्याने समाधान असल्याचे ते सागतात.
अधिक वाचा: उद्योगाची चाके गतिमान; १२२ कारखाने सुरु करण्यास परवानगी