अकोला- करोना नामक महामारीने आज संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे, संपूर्ण जग ह्या महामारीने हादरले आहे, ह्या महामारी पासून वाचायचे असेल तर घरात राहणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सर्व जगाने मान्य केले आहे, त्या साठी आज संपूर्ण जग घरात बसले आहे.
करोना चा प्रादुर्भाव टाळण्या साठी सामाजिक दुरी हाच एकमेव पर्याय असल्याने गर्दी टाळण्या साठी संपूर्ण देशात दिनांक 22 मार्च पासून लॉक डाउन घोषित करण्यात आल्याने त्याचा सर्वात जास्त फटका जेष्ठ नागरिकांना बसला आहे, अकोला शहरात असे बरेच जेष्ठ नागरिक आहेत जे पूर्वी पासून एकटे आहेत त्यात आणखी अश्या जेष्ठ नागरिकांची भर पडली आहे ज्यांचे कुटुंबीय, मुले काही कारणाने लॉक डाउन मुळे बाहेर जिल्ह्यात किंवा बाहेर राज्यात अडकले आहेत.
अश्या जेष्ठ नागरिकांना वाईद्यकीय मदत किंवा इतर तात्काळ मदत लागल्यास संचारबंदीच्या काळात त्यांचे हाल होऊ नये म्हणून शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पुढाकार घेतला आहे, त्यांना जठरपेठ भागातील एका जेष्ठ नागरिकाचा फोन आला की त्यांची पत्नी जीचे वय 75 पेक्षा जास्त आहे त्या आजी ची तब्येत 4 दिवस झाले बरी नाही, व उपचार करण्या साठी कोणीही डॉक्टर उपलब्ध नाही, त्यांचा फॅमिली डॉक्टर फोन उचलत नाही, करिता मदत पाहिजे हीमाहिती मिळताच पोलीस निरीक्षक गजानन शेळके तात्काळ तेथे पोहचले व सामाजिक कार्यकर्ते कपिल रामदेव ह्यांची मदत घेऊन त्यांना तात्काळ वाईद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.
अशी कोणतीही तात्काळ मदत कोणत्याही एकटे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकाला पाहिजे असल्यास शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी शहराच्या प्रत्येक चौकात उपलब्ध राहतील किंवा पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मोबाईल क्र 9423338424 किंवा अकोला पोलिसांच्या नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र 0724 435500 ह्या क्रमांकावर संपर्क केल्यास तत्काळ मदत पुरविण्यात येईल, सदर मोहीम पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे कर्मचारी पार पडणार आहेत, करिता जेष्ठ नागरिकांनी न घाबरता फक्त एक फोन करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे।
अधिक वाचा: अकोट शहरात धडक कारवाई ; मास्क न घालने पडले महागात