हिवरखेड: हिवरखेड नगरीत कोरोना विषाणूचा पुढील येत्या काही दिवसात प्रादुर्भाव टाळण्याकरिता प्रेस क्लब हिवरखेड ची विशेष सभा सोशल डीस्टन्सिंग च्या नियमांचे पालन करित संपन्न झाली. या आयोजित सभेत यापूर्वी हिवरखेड कोरोना मुक्त समिती व प्रेस क्लब यांच्या संयुक्तमानाने केलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
यापुढेही हिवरखेड पूर्णतः कोरोनामुक्त राहणेसाठी उपयोजना व गरजू लोकांना मदतीचा हात मिळावा यासाठी प्रेस क्लब हिवरखेड कोरोना मुक्त समितीसोबत कार्य करण्यास कटिबंध असणार आहे, असा सूर या सभेत होता. या सभेत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यामध्ये प्रेस क्लब मध्ये गटनिहाय आखणी करण्यात आली. या विभागणी केलेल्या गटाला विविध कामाची जबाबदारी देऊन सामाजिक कार्यासाठी पुढे येणाऱ्या दानशूर नागरिकांच्या सहकार्याने व विविध विभागाच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्या मार्गदर्शात पुढील कार्याला दिशा देण्यासाठी चर्चा करण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव हिवरखेड हे पूर्णतः कोरोना पादुर्भावापासून सद्यस्थिती सुरक्षित आहे. भविष्यातही सुरक्षित राहावे याकरिता उपाययोजना, मदतकार्य, नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रेस क्लब च्या वतीने सांगण्यात येत असून यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, सोशल डीस्टन्सिंग च्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे या परिस्थितीत गरजू लोकांना मदत पोहोचविण्यासाठी त्याची माहिती प्रेस क्लब व हिवरखेड कोरोना मुक्त समिती पर्यंत पोहचावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक वाचा: अकोट शहरात धडक कारवाई ; मास्क न घालने पडले महागात