अकोला: सध्या संपूर्ण देशात कोरोना च्या विषाणूने आपले पाय पसरविले असून त्याला आळा घालण्यासाठी शासनाने संचार बंदी लागू केलीय व विविध उपाययोजना शासनाकडून करण्यात येत असून शहरात महापालिकेद्वारे सॅनिटाईज फवारणी,जंतू,नाशक फवारणी ही सुरू आहे त्या अनुषणगांने
कुणाल शिंदे मित्र परिवार तर्फे प्रभाग क्र.20 मध्ये जंतू नाशक फवारणी सुरू करण्यात आली.विशेष म्हणजे फवारणी यंत्र हे घरी तय्यार करून फवारणी करण्यात येत आहे माल वाहक गाडी मध्ये डिझेल वर फिरणारे जनरेटर आणि कॉम्प्रेसर फिट करून हे यंत्र यशस्वी पणे संपूर्ण शहरात फवारणी करत आहे. म.न.पा च्या फवारणी च्या गाड्या जिथे पोहीचल्या नाहीत अशा ठिकाणी सुद्धा हे यंत्र पाठविण्यात येईल असे कुणाल शिंदे यांनी माहिती दिली असून यावेळी शिवसेना आमदार नितिन देशमुख यांनी या यंत्राची पाहणी करून या यंत्राने फवारणी कशी करता येईल व हे यंत्र कशे बनविण्यात आलेय याची माहिती जाणून घेतलीय ,नागरिकांनी अतिआवश्यक कामा शिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला यावेळी आ.नितीन देशमुख यांनी व कुणाल शिंदे मित्र परिवाराणे दिलाय.