अकोट (तालुका प्रतिनिधी शिवा मगर): आज दिनांक 09 04 2020 रोजी पहाटे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे डी बी पथकाला एक टाटा सुमो अकोट वरून ग्राम कालवडी मार्गाने चौहोटया कडे अवैध देशी दारू घेऊन जाणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलीस स्टेशन पो स्टे अकोट ग्रामीण चे ठाणेदार ज्ञानोबा फळ यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ते कालवाडी रोड वरील कालवाडी फाटा येथे डी बी पथकाने नाकाबंदी लावली दरम्यान मिळालेल्या माहीती प्रमाणे अकोट कडू एक पांढऱ्या रंगाची टाटा सुमो येताना दिसली तिला थांबून पंचा समक्ष नमूद गाडीतील ईसमा ना त्यांचे नाव गाव पत्ता विचारला असता त्यांनी पंचा समक्ष त्यांचे नावे (1 ) मंगेश महादेव एकिरे वय 35 ( 2) गोपाल परलाद वावरे वय 33
दोन्ही राहणार ग्राम चोहोटा बाजार सांगितले सदर टाटा सुमो ची पंचा समक्ष झडती घेतली असता नमूद गाडीत सहा बॉक्स मध्ये प्रति बॉक्स 48 नग देशी दारू टॅंगो पंच कंपनीचे सीलबंद 288 बॉटल किंमत 17280 रुपये सदर देशी दारू अवैधरीत्या वाहतुकीकरिता वापरलेली पांढऱ्या रंगाची गाडी टाटा सुमो गोल्ड वाहन क्रमांक MH 30 AF 2198 किंमत. 4 लाख 50 हजार रुपये असा एकूण 4 लाख 67 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त केला वरून पोलीस स्टेशन ला नमूद आरोपी तावर कलम 65 .अ .ई .83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सह कलम 188 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे तसेच सदर अवैद्य दारू पुरविणाऱ्या देशी दारू दुकान वर व्यवस्थापकावर वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई मा श्री सुनील सोनवणे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट यांच्या मार्गदर्शना खाली अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फळ गुन्हे शोध पथकाचे एस आय नारायण वाडेकर. गजानन भगत . प्रवीण गवळी अनिल शिरसाठ यांनी केली