• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सविस्तर; अकोल्यात आढळला ‘पहिला पॉझिटिव्ह’ रुग्ण

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in Featured, कोविड १९, विदर्भ
Reading Time: 1 min read
81 0
0
corona-virus-in-indian-villages
12
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.७– जिल्ह्यात आज (सायं. पाच वा.) अखेर प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील पहिला कोरोना संसर्गित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण अकोला शहरातील बैदपूरा भागातील रहिवासी आहे. आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) केवळ एक जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाला. त्याचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत १२३ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी ८६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ८५ निगेटिव्ह आहेत. तर एका जणाचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. हा रुग्ण ही  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात विलगीकरण करुन दाखल करण्यात आला आहे. अद्यापही ३७ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. हे ३७ जण सध्या विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून २५८ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ७४ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. (५७ जण गृह अलगीकरणात तर १७ जण संस्थागत अलगीकरणात) तर १२६ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर ५७ जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तीन किमी परिघातील भाग ‘सिल’

जिल्ह्यातला पहिला कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण हा अकोला शहरातला आढळला आहे. हा रुग्ण ज्या भागातील आहे त्या बैदपूरा या भागाला केंद्रबिंदू मानून तीन किमी परिघातील परिसर  तसेच दोन किमीचा बफर झोन असा पाच किमी परिसर ‘सिल’ करुन त्यातील तीन किमी परिसरात प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येईल. हा संपूर्ण भाग बंद ठेवण्यात येईल. बाहेरुन कुणालाही या भागात प्रवेश दिला जाणार नाही वा या भागातून कुणीही बाहेर जाऊ शकणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. यासंदर्भात स्वतंत्र आदेश जिल्हाप्रशासनाने निर्गमित केले. या भागाला सिलबंद राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ही तैनात असेल, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त राखून या भागातील लोक बाहेर व बाहेरील लोक या भागात येणार नाहीत यासंदर्भात कलम १४४ नुसार संचारबंदीची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलिसांना दिले आहेत.

घरोघरी होणार तपासणी

मनपाचे आयुक्त संजय कापडणीस हे आता येथील मनपा आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत आरोग्य तपासणीसाठी  आशा स्वयंसेविका , आरोग्य सेवक यांचे पथक तयार करतील. हे पथक घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी करतील. संपूर्ण परिसर निर्जंतूक केला जाईल. त्यासाठी मनपा मार्फत विशेष अभियान या भागात राबविण्यात येईल. प्रत्येक कुटूंबाची आरोग्य तपासणी होईल व माहिती घेतली जाईल, त्यासाठी येणारे आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोकांनी घरातच थांबावे

जिल्ह्यात कोरोना दाखल झाला आहे, ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन आतातरी लोकांनी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. कोरोना संसर्गित रुग्ण ज्या बैदपूरा  भागातील आहे तेथून तीन किमी परिसर परिघातील भाग सिलबंद होणार आहे. आता कोरोना विषाणू संसर्ग अकोला जिल्ह्यात आणि शहरातही पोहोचला आहे ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच थांबावे, बाहेर कुणाशीही संपर्क टाळावा, वारंवार हात धुवावे, मास्क लावल्याशिवाय बाहेर जाऊ नये,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

‘पॉझिटिव्ह’ रुग्णाची पत्नी मात्र ‘निगेटिव्ह’

ज्या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे त्या रुग्णाची नजिकच्या काळातील कोणत्याही प्रवासाची नोंद नाही. या रुग्णासोबत त्याच्या पत्नीचेही नमुने पाठविण्यात आले होते. त्याच्या पत्नीचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. या रुग्णाला तीन वर्षांपासून दम्याचा विकार असल्याची वैद्यकीय नोंद आहे,असेही सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा – ( व्हिडिओ) कोरोना ब्रेकिंग – अकोला जिल्हात कोरोनाचा पहिला रुग्ण

Tags: अकोला कोरोना न्यूजअकोला जिल्हाअकोला जिल्हा बातमीकोरोना रुग्ण
Previous Post

( व्हिडिओ) कोरोना ब्रेकिंग – अकोला जिल्हात कोरोनाचा पहिला रुग्ण

Next Post

चालू महिन्यात ७९४५ मेट्रिक टन अन्नधान्य वाटपाचे नियोजन ;मोफत तांदुळ आजपासून उपलब्ध

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Fress Ration

चालू महिन्यात ७९४५ मेट्रिक टन अन्नधान्य वाटपाचे नियोजन ;मोफत तांदुळ आजपासून उपलब्ध

corona-virus-in-indian-villages

कोरोना अलर्ट : बुलढाण्यात अजून 2 पॉझीटीव्ह

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.