अकोला दि.७ एप्रिल : अकोला जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सायंकाळी पाच वाजता प्राप्त अहवालानुसार
जिल्ह्यात एक कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण सापडला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर दिली. रुग्ण हा बैदपुरा अकोला येथील आहे.
जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य खाते, महापालिका यासह सर्व यंत्रणांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे जिल्ह्यात नवीन एकही ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. मात्र आज एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
सविस्तर बातमी – अकोल्यात आढळला ‘पहिला पॉझिटिव्ह’ रुग्ण