अकोट (शिवा मगर): लॉक डाउन मुळे ग्रामीण आणि शहरी भागात विमल आणी प्रतिबंधित गुटका यांची सर्रास विक्री सुरू असून त्यांचा काळाबाजार मोठा प्रमाणात पुरवठा करून लोकांच्या आरोग्यासोबत खेळत आहेत. यांना निर्बंध करण्याकरिता आकोट च्या महसूल विभागाने कंबर कसली असून वेगवेगळ्या ठिकाणी आज छापा टाकण्यात आला आहे.सदर कारवाई करिता महसूल विभागाने आव्हान केले आहे की जर अशी माहिती असल्यास महसूल विभागाला कळविण्यात यावे नक्की कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे, विमल आणि इतर प्रतिबंधित गुटका यांची सर्रास विक्री सुरू असल्याने गोपनीय माहितीच्या आधारे अकोट येथील गजानन नगर मध्ये गिरीष प्रोविजन या जनरल स्टोअर च्या दुकानात विमल गुटका पान मसाला, तंबाखु इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच अकोट मधील ग्रामीण भागात अकोला जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील प्रतिबंधात्मक आदेश पारित करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आकोट तालुक्यातील वस्तापूर येथील ग्रामपंचायत च्या बाजूला असलेले वस्तापूर मधील किराणा दुकानाची तपासणी केली असता त्यांच्या दुकानांमध्ये अवैधपणे तंबाखू व तंबाखू च्या पुड्या विक्री करत असल्याचे आढळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व या सर्व आरोपींवर कलम 188 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते आहे सदर कारवाई अकोट चे प्रभारी तहसीलदार श्री एच बी गुरव साहेब यांनी व याच्या टीमने केल्याने गुटखा खाणारे आणि गुटख्याची विक्री करणारे यांनी आता सावधगिरी बाळगणे सुरुवात केली आहे महसूल विभागाची ही धडक मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे प्रभारी तहसीलदार अकोटचे श्री एच बी गुरव यांनी सांगितले.