अकोला: प्रभाग १३ चे नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी आपल्या प्रभागातील गरजू आणि हातमजुरी वर उदरनिर्वाह करणाऱ्या परिवारांची लॉक डाऊन मुळे होत असलेली अडचण लक्षात घेऊन त्यांच्या साठी अन्नधान्य आणि गहू , तादुळ पुरविण्याचे ठरवले होते आणि त्या करिता त्यांनी इच्छुक दात्यांना आवाहन केले होते त्याला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला
संकलित केलेल्या अन्नधान्याचे गरजूंना वाटप आज संस्कार गार्डन मध्ये सुरू करण्यात आले.
यावेळी सोशल डिस्टनसिंग चे पालन करून आणि योग्य ती खबरदारी घेऊन वाटप सुरू केले आहे.यावेळी आशिष पवित्रकार यांनी शहरातील सर्व लोकप्रतिनिधींना ही विनंती केली आहे की या आणीबाणीच्या काळात इच्छुक दात्यांन कडून जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करून ते गरजू आणि अडचणीत असलेल्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा जेणेकरून कोरोना चा पराभव तर होईलच पण लॉक डाऊन मुळे कुणाला उपाशी राहायची वेळ येणार नाही.