• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 29, 2022
34 °c
Akola
35 ° Thu
33 ° Fri
33 ° Sat
33 ° Sun
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

कोरोना व्हायरसची हि लक्षणं कोणती, त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in Corona Featured, राष्ट्रीय
Reading Time: 2 mins read
0
कोरोना व्हायरसची हि लक्षणं कोणती, त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 203 देशा-प्रांतांमध्ये पोहोचला आहे. तर जगभरात सुमारे 7 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून मृतांचा आकडा 33 हजारपेक्षा जास्त झाला आहे.

हेही वाचा

Agniveer Recruitment: मोठी बातमी! अग्निवीर भरतीसाठी अधिसूचना जारी, आठवी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

‘अग्निपथ’ वर पंतप्रधान मोदी म्हणाले, चांगल्या हेतूने राबवण्यात..

या व्हायरसचे सगळ्यात जास्त रुग्ण सध्या अमेरिकेत आढळले आहेत, त्यापाठोपाठ इटली, चीन आणि स्पेनमध्ये बाधितांची संख्या जास्त आहे.

भारतातही 30 जानेवारी रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत 1764 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 50 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

हा आकडा वाढताच असल्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे, तसंच आरोग्य व्यवस्था वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सरकार करत आहेत.

कोरोना विषाणू आहे काय?

रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं.

कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.

या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे.

आजारपणापासून चार हात दूर राहण्यासाठी हात कसे धुवावेत?

सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002 साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता.

कोरोनाची लक्षणे

  • डोकेदुखी
  • नाक गळणे
  • खोकला
  • घसा खवखवणे
  • ताप
  • अस्वस्थ वाटणे
  • शिंका येणे, धाप लागणे
  • थकवा जाणवणे
  • न्युमोनिया, फुप्फुसात सूज

हा विषाणू अजूनही नियंत्रणात आणता येईल, असं यापूर्वी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटलं होतं.

कोरोना विषाणू किती गंभीर आहे?

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणं दिसतात. मात्र, लागण गंभीर असेल तर मृत्यूही ओढावू शकतो.

युनिवर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये प्राध्यापक असलेले मार्क वूलहाऊस म्हणतात, “हा नवीन कोरोना विषाणू आम्हाला आढळला तेव्हा आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्याचा परिणाम इतका घातक का आहे. सर्दीची सामान्य लक्षणं यात दिसत नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.”

कोरोना विषाणू आला कुठून?

हा विषाणुचा नवीन प्रकार आहे. हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही.

नॉटिंगम युनिवर्सिटीत वायरोलॉजीचे प्राध्यापक असलेले जोनाथ बॉल यांच्या मते, “हा अगदी नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आहे. या विषाणूची लागण प्राण्यांमधूनच माणसाला झाली असावी, अशी दाट शक्यता आहे.”

सार्स हा विषाणू मांजरातून माणसांत आला होता. मात्र, या विषाणूचा मूळ स्रोत कोणता आहे, याची अधिकृत माहिती चीनने अजून दिलेली नाही.

चीनच का?

प्रा. वूलहाऊस यांच्या मते लोकसंख्येचं प्रमाण आणि त्याची घनता यामुळे चीममधले लोक लगेच प्राण्यांच्या संपर्कात येतात. ते म्हणतात, “येणाऱ्या काळात चीनमध्येच पुन्हा असं काही ऐकायला मिळालं, तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.”

कोरोना विषाणूचा फैलाव सहज होतो का?

या विषाणुची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याची अनेक उदाहरणं समोर आल्याचं चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

कोरोना विषाणुग्रस्त रुग्णांची देखभाल करणाऱ्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही या विषाणुची लक्षणं दिसली आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

या विषाणुविषयी चिंता वाटण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे या विषाणुमुळे सर्वांत आधी फुफ्फुसांवर परिणाम होतो. या विषाणुची लागण होताच व्यक्तीला खोकला सुरू होतो.

मात्र, सध्या जी आकडेवारी मिळते आहे तीच अंतिम असेल, असं आताच म्हणता येणार नाही.

विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे का?

या विषाणूचा परिणाम मर्यादित असेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. मात्र, डिसेंबर नंतर अनेक प्रकरणं पुढे आली.

या संसर्गाची सुरुवात चीनमधल्या वुहान शहरातून झाली. मात्र, आता या विषाणुचा फैलाव चीनमध्यल्या इतर शहरात आणि चीनबाहेरही झालेला आहे.

थायलंड, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियातही कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. वुहान शहरातून आलेले लोक कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता जास्त आहे.

कोरोनाची लागण झालेल्या सर्वच लोकांची ओळख पटली आहे, असं गरजेचं नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

नवीन वर्षांत चीन फिरायला गेलेल्या अनेक पर्यटकांच्या माध्यमातून या विषाणूचा फैलाव चीनबाहेरील अनेक देशांमधल्या लाखो लोकांमध्ये झाला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

 

उपाययोजना

कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर स्वतंत्र खोलीत उपचार सुरू आहेत, जेणेकरून इतरांना याचा संसर्ग होऊ नये. प्रवाशांना ताप आहे का, हे तपासण्यासाठी प्रवासी ये-जा करतात अशा सर्व ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय स्वच्छता राखता यावी आणि संसर्ग टाळवा, यासाठी सी-फूड मार्केट काही काळ बंद करण्यात आले आहेत.

या सर्व उपाययोजना केवळ चीनमध्ये करण्यात आल्या आहेत, असं नाही. चीनव्यतिरिक्त आशियातील इतर अनेक देश आणि अमेरिकेतही असेच खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.

तज्ज्ञ काय सांगतात?

डॉ. गोल्डिंग म्हणतात, “सध्या आमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार परिस्थिती किती चिंताजनक आहे, हे सांगणं कठीण आहे.”

“कोरोना विषाणूच्या स्रोताची माहिती मिळत नाही तोवर अडचणी कायम राहणार आहेत.”

माणसाला संसर्ग करणाऱ्या आणि विशेषतः पहिल्यांदाच संसर्ग करणाऱ्या प्रत्येक विषाणुविषयी चिंता करायला हवी, असं प्रा. बॉल यांचं म्हणणं आहे.

कारण जेव्हा पहिल्यांदाच एखाद्या विषाणूचा फैलाव होतो तेव्हा तो कसा रोखायचा, त्यावर कोणते उपचार आहेत, हे सगळं जाणून घेण्यात बराच वेळ जात असतो.

Tags: how to stay safe in coronahow to wash proper handswhat not to do in coronawhat to do in coronaअकोला कोरोना न्यूजकोरोना काळजीकोरोना ची लक्षणे
Previous Post

तबलिगींमुळे तब्बल 9000 लोकांवर कोरोनाची टांगती तलवार

Next Post

कोरोना रूग्ण सापडल्यानंतर बिल्डिंग सील, अभिनेत्री आई-वडिलांच्या काळजीने चिंतीत

RelatedPosts

अग्निपथ
Featured

Agniveer Recruitment: मोठी बातमी! अग्निवीर भरतीसाठी अधिसूचना जारी, आठवी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

June 21, 2022
narendra-modi-on-corona
Featured

‘अग्निपथ’ वर पंतप्रधान मोदी म्हणाले, चांगल्या हेतूने राबवण्यात..

June 20, 2022
Narendra Modi
Featured

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचं 100व्या वर्षात पदार्पण! मातोश्रींचे पाय धुवून घेतला आशीर्वाद

June 18, 2022
अग्निपथ
Featured

विरोधानंतर सरकारने घेतला मोठा निर्णय; अग्निपथ योजनेसाठीची वयोमर्यादा वाढवली

June 17, 2022
घरगुती गॅस
Featured

घरगुती गॅस सिलिंडरची नवीन जोडणी महागली; ग्राहकांना २ हजार २०० रुपये मोजावे लागणार

June 15, 2022
सैन्‍यदलात नोकरीची संधी : जाणून घ्‍या, केंद्र सरकारच्‍या अग्‍निपथ भरती योजनेची माहिती
Featured

सैन्‍यदलात नोकरीची संधी : जाणून घ्‍या, केंद्र सरकारच्‍या अग्‍निपथ भरती योजनेची माहिती

June 14, 2022
Next Post
aahana-kumra

कोरोना रूग्ण सापडल्यानंतर बिल्डिंग सील, अभिनेत्री आई-वडिलांच्या काळजीने चिंतीत

Karishma Kapor

CoronaVirus: कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करिश्मा कपूरने दिला मदतीचा हात

आपली प्रतिक्रिया Cancel reply

Stay Connected

  • 329 Followers
  • 283 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

सामाजिक न्याय दिन; विविध कार्यक्रमाचे आयोजन

सामाजिक न्याय दिन; विविध कार्यक्रमाचे आयोजन

June 25, 2022
सामाजिक न्याय दिन: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी विविध उपक्रम

सामाजिक न्याय दिन: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी विविध उपक्रम

June 27, 2022
सामाजिक न्याय विभागाचे विशेष चित्रप्रदर्शन: 148 छायाचित्रांतून उलगडणार राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा पट

सामाजिक न्याय विभागाचे विशेष चित्रप्रदर्शन: 148 छायाचित्रांतून उलगडणार राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा पट

June 27, 2022
ITI

मुलींसाठी आयटीआय प्रशिक्षण; प्रवेश प्रक्रिया सुरू

June 27, 2022
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks