तेल्हारा:-संपूर्ण देशभर कोरोणा या या विषाणूने थैमान घातले असून देशावर व राज्यावर मोठे आर्थिक संकट आले असल्याने देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यात सर्वात जुनी व नामांकित शिक्षण संस्था असलेल्या सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हारा च्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधी ला दोन लाख रुपये देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आव्हान कडून सामाजिक, शैक्षणिक व व औद्योगिक संस्थे सोबतच संपूर्ण देशवासीयांना आर्थिक मदतीचे आव्हान केले आहे त्यावर सेठ बन्सीधर एज्युकेशन दहिगावकर सोसायटीचे अध्यक्ष बेनीप्रसाद झुनझुनवाला यांनी केंद्र व राज्य शासनाला मदत करण्याचे ठरविले त्यांनी सदर प्रस्ताव संस्थेच्या संचालक मंडळासमोर ठेवला असता सर्व संचालक मंडळांनी त्याला एक मताने मंजुरात दिली
त्यावर सदर संस्थेने पंतप्रधान व व मुख्यमंत्री सहायता निधी खात्यामध्ये ऑनलाइन द्वारे प्रत्येकी एक लाख रुपये असे एकूण दोन लाख रुपये जमा केले असता त्याची पावती संस्थे अंतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाचे अध्यक्ष गोपालदास मल्ल यांच्या हस्ते तहसीलदार तेल्हारा यांना देण्यात आली. ज्यांना शक्य असेल त्यांनी अशा संकट काळी यातास्तीती मदत शासनाला करण्याचे आव्हान संस्थेचे अध्यक्ष बेनीप्रसाद झुनझुनवाला यांनी केले
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलास जोशी कोषाध्यक्ष विठ्ठल खारोडे संचालक राजेंद्र शहा पुष्कर तागडे अश्विनी खारोडे अभिजित शहा विष्णू मल्ल डॉ विक्रम जोशी व शी. र. पडिया हे हे उपस्थित होते