अकोला(प्रतिनिधी)- चालू वर्षातील जानेवारी व फेब्रुवारी ह्या 2 महिन्यात शहर वाहतूक शाखेने नवीन इंटर सेप्टर वाहनातील स्पीडगण चा उपयोग करून तब्बल 1700 कारवाया केल्या असून ,शहरात सुद्धा वेळोवेळी मोहीम राबवून टपोरी गिरी करणारे, चालू वाहनांवर स्टंटबाजी करणारे, वेगाने वाहन चालविणारे, मोटरसायकल वर क्रमांक टाकण्याचे ऐवजी भलतेच काही लिहणारे वाहन चालक हेरून त्यांचेवर कारवाई करण्याचा व वेळप्रसंगी त्यांचे वाहन ट्राफिक ऑफिस ला जमा करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे.
अकोला शहरात जवळपास सर्वच प्रमुख रस्ते ,ज्या मध्ये नेकलेस रोड, नेहरू पार्क ते अशोक वाटिका ते अग्रसेन चौक, अकोट स्टँड ते शिवाजी महाविद्यालय , ह्या रोडची विकास कामे सुरू असल्याने शहर वाहतूक शाखेची वाहतूक सुरळीत ठेवण्यात जास्त मनुष्यबळ खर्ची पडते, तरी सुद्धा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून टपोरी गिरी व स्टंट बाजी करणारे वाहन चालक, मोटारसायकल वर क्रमांक टाकण्या ऐवजी भलताच मजकूर लिहणारे, कागदपत्रे जवळ न बाळगणारे, नो पार्किंग मध्ये वाहन उभे करणारे, ट्रिपल सीट तसेच धावत्या वाहनांवरमोबाईल वर बोलणाऱ्या वाहन चालकांवर धडक कार्यवाही करून दोन महिन्यात जवळपास 9000 वाहन चालकांवर कार्यवाही करून जवळपास 12 लाख दंड वसूल केला आहे.
अशी धडक मोहीम सुरूच राहणार असून सध्या परीक्षेचे दिवस असल्याने पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केली आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0