तेल्हारा(प्रतिनिधी)- सरकारी कार्यालय निवासस्थाने म्हटली की स्वच्छता कश्याप्रकारची असते हे सांगण्याचे काम नाही मात्र तेल्हारा येथील एका शासकीय कार्यालयाचे मुखीया स्वतः हातात झाडू घेऊन साफसफाई करतो म्हटल्यावर नवल वाटणार मात्र हे खरं आहे.
तेल्हारा येथील जोखमीचे काम करणारा विभाग म्हणजेच जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार आणि रोज लोकांना सामोरे जावे लागणारा विभाग म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय येथील रजिस्ट्रार असलेले भागवत गायकवाड हे आपल्या कार्यलयाची स्वतः साफसफाई करतात.
आपणदरोरोज बघत असलेल्या शासकीय कार्यलय व तेथील अधिकारी कशाप्रकारे आपला कारभार चालवितात मात्र गायकवाड हे अपवाद असून त्यांचे कार्यालय हे ते स्वतः साफ करतात स्वच्छता गृहासोबतच तेथील परिसर स्वच्छ करून पाण्याने धुवून काढतात त्यांचा हा आपल्या कार्यलयप्रतीचा आपुलकीचा भाव वाखाण्यासारखा आहे.त्यात सरकारने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला असून सकाळी पावणे दहाला कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक केले आहे.
मात्र बऱ्याच ठिकाणी अधिकारी कर्मचारी वेळेवर उपस्थित नसतात मात्र गायकवाड हे आधीपासून साडेनऊच्या आधी आपल्या कार्यालयात हजेरी लावतात.जर एखादा अधिकारी आपल्या कार्यलयाची स्वतः साफसफाई करीत असणार तर हे बाब इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारी आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0