• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सर्व अवैध धंदे बंद करा अन्यथा रास्तारोको,अनुचित प्रकार घडल्यास पोलिस व महसूल विभाग जबाबदार- युवक कांग्रेस

Team by Team
May 6, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
82 1
0
Our akola
12
SHARES
595
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड (प्रतिनिधी)- हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांना प्रचंड उधाण आले असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. हे अवैध धंदे बंद करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस तर्फे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, हिवरखेड ठाणेदार इत्यादी वरिष्ठ स्तरावर निवेदने दिली आहेत.

अडगाव हे हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे अति संवेदनशील गाव असून या गावात अवैध धंद्यांना प्रचंड उधाण आले आहे. याकडे महसूल विभाग व पोलिस विभाग लक्ष द्यायला तयारच नाही. यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास याला पोलीस विभाग आणि महसूल विभाग जबाबदार राहणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

घरकुल, घराची कामे, रस्त्यांची कामे, मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ह्याकरिता मोठ्या प्रमाणात रेतीची आवश्यकता असते. नदी-नाले यांची रेती करिता हराशी झालेली नाही तरी सुद्धा गावातील ट्रॅक्टरद्वारे रेतीचा उपसा करणे अविरत सुरू आहे. यामध्ये काही राजकीय नेत्यांचे ट्रॅक्टर दिवस-रात्र रेतीची वाहतूक केली जात आहे. रेतीचे एजंट सुद्धा सक्रिय झालेले आहेत. एक ट्रॉली रेती पाच हजार रुपयांच्या जवळपास विकल्या जात आहे.

कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरलेली नसते ह्याची पटवारी, मंडळ निरीक्षक तथा तहसीलदार तेल्हारा यांना वारंवार सूचना देऊनही कोणताही फरक पडत नाही. कारण त्यांच्यावर राजकीय नेत्यांचा दबाव असतो असा आरोप सुद्धा निवेदनातून करण्यात आलेला आहे. बाहेरगावचे वरली मटक्याचे माफिया खायवाडी करण्यासाठी येथे येऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात वरली-मटक्याचा धंदा वाढवला आहे. अडगाव बुद्रुक, हिवरखेड ते अकोला पर्यंत आम्ही सर्व संबंधितांना योग्य प्रमाणात “महाप्रसाद” पोहोचवत असल्यामुळे आमचे पोलिस काहीच करू शकत नाही असे हे खायवाढ मोठ्या हिमतीने सांगतात. वरली, मटका, बावन्न पत्त्यांचे क्लब, गुटखा, देशी अवैध दारू, इत्यादी सर्वच प्रकारचे अवैध धंदे येत्या पंधरा दिवसात बंद न झाल्यास अडगाव बुद्रुक येथील बस स्टैंड वर मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आणि होणाऱ्या सर्व परिणामांना पोलीस प्रशासनची जबाबदारी राहील असेही निवेदनात नमूद आहे.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0

Tags: अकोलाअकोला जिल्हागावात अवैध धंद्यांना प्रचंडगुटखादेशी अवैध दारूबस स्टैंडबावन्न पत्त्यांचे क्लबमटकावरलीहिवरखेड पोलीस स्टेशन
Previous Post

रखडलेल्या तेल्हारा हिवरखेड रस्त्याच्या बांधकामाच्या धुळी मुळे शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Next Post

तेल्हारा येथे स्वतः अधिकारीच करतो आपल्या कार्यालयाची साफसफाई, कुठले आहे हे कार्यालय वाचा सविस्तर

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
कार्यालयाची साफसफाई

तेल्हारा येथे स्वतः अधिकारीच करतो आपल्या कार्यालयाची साफसफाई, कुठले आहे हे कार्यालय वाचा सविस्तर

पोलीस वाहतूक शाखेने

अबब अकोला पोलीस वाहतूक शाखेने दोन महिण्यात वेगाने वाहन चालवणाऱ्या १७०० जणांवर केल्या कारवाया,पोलिसांचे टपोरीगिरी करणाऱ्यांवर विशेष लक्ष

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.