तेल्हारा(किशोर डांबरे)- तेल्हारा येथील मागील एका वर्षांपासून तेल्हारा हिवरखेड रस्ताचे बांधकाम मंद गतीने सुरू आहे. या रस्त्याच्या धुळी मुळे तेल्हारा हिवरखेड मार्गावरील आजूबाजूला असलेल्या शेत पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
या बाबत या मार्गावरील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय येथे आज दि ०२मार्च२०२० रोजी निवेदन दिले व या रस्त्याचे काम कंत्राटदार अत्यंत मंद गतीने करत रस्त्याच्या धुळीवर संबंधित कंत्राटदाराकडून पाणी न मारता दुर्लक्ष करत आहेत.
रस्त्यावरील धुळी मूळे मोठया प्रमाणावर वाहतूकीस अडथळा व शेतीस नुकसान होत आहे त्याच बरोबर रब्बी हंगामातील हरबरा, गहू या सारख्या पिकांना धुळी मुळे या पिकांचे नुकसान झाले आहे तरी संबधीत कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनि केली आहे त्या निवेदना वर यांच्या स्वाक्षरी आहेत विष्णु गोपालदास मल्ल विजय पांडुरंग धनभर रामभाऊ दयाराम भुजबुले शेषराव मार्तंड झाडोकार श्रीराम ठाकरे योगेश बिडवे गजानन चोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0