तेल्हारा (विशाल नांदोकर)- डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय तेल्हारा येथे नेहरू युवा केंद्र अकोला यांच्या अंतर्गत युवा संसद ‘चला बोलू मौन सोडू’ हा कार्यक्रम पार पडला. सध्या सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचाराला आळा घालणे, महिला सशक्तीकरण, व इतर विषयांवर युवकांमार्फत वाचा फोडून मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या घडत असलेल्या विकोपीय घटनांना वाढ होत असतांना यावर आढा घालण्यासाठी युवतींनी बोलत व्हावं त्याकरिता नेहरू युवा केंद्र यांच्या अंतर्गत युवा संसद ‘चला बोलू मौन सोडू’ या कार्यक्रमाचे आयोजन करून डॉ. गो. खे. महाविद्यालयातील युवक युवतींना बोलत करत त्यांचे विचार मांडून कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्या तसेच स्वतःच्या जीवनात कसे वागावे, जीवनातील अनुभव आणि जीवन जगत असताना कोणत्या गोष्टीचा आधार घ्यावा, विद्यार्थी जीवन कसे असावे हे विद्यार्थी जीवनात काही गोष्टी ज्या संभाळून कराव्या लागतात याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. केदार सर यांनी विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपली कामगिरी उच्चपातळीवर ठेवावी व प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर रहावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रा. कवर्के सर यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निलेश जवकार तसेच विशाल नांदोकार हे उपस्थित होते. विशाल नांदोकार यांनी ‘आई’ या कवितेच्या माध्यमातून आईचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.
सूत्रसंचालन करत असताना बंटी राऊत यांनी कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन करून सूत्रसंचालन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या भावना मनसोक्त मांडल्या. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच स्वामी विवेकानंद युवा मंडळाचे शेरी, कोठा माळेगाव, बेलखेड, गाडेगाव चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे शेवट म्हणजे आभार प्रदर्शन चेतन पिंजरकर यांनी केले.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8