दानापूर (वा)- दानापूर येथिल जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी सर्व प्रथम दीपप्रज्वलन करून क्रांती जोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
तत्पूर्वी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था शाळेच्या वतीने करण्यात आली होती. यावेळी 1 ते 5 वि च्या विद्यार्थीयांनी सामजिक, प्लास्टिक जनजागृती, देश भक्ती पर गित, शेतकऱ्यांचे जिवन यावर विविध विषयावर नाटिका सादर केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष महादेव वानखडे तर प्रमुख उस्थितीत म्हणून दानापूर च्या सरपंच सौ, अनुराधा गोयनका, पंचयत समिती सदस्य संदीप पालिवाल, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तेल्हारा पंचायत समिती चे बि, इ, ओ, दिनेश दुतंडे, डॉ, सौ अंजली पातुर्डे, वैद्यकीय अधिकारी संग्रामपूर, विस्तार अधिकारी श्री, भुजबले, दीपक दही, केंद्र प्रमुख गजानन गायगोल, जी, प, पतसंस्था अध्यक्ष श्री विजय टोहरे, विशाल घोगले, केंद्र प्रमुख रविंद्र वासनकार,राजेश चित्ते, श्री उगले, सुरेश खोडे, देवमन रौदळे या वेळी उपस्थित होते.
या वेळी नंदकिशोर नागपुरे व रविंद्र तायडे यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री ,विश्वेश्वर पातूर्डे यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल भेट वस्तू यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ खोडे मॅडम, सौ गायगोळ मॅडम यांनी केले तर प्रस्ताविक महादेव वानखडे यांनी तर आभार मुख्याध्यापक श्री विश्वेश्वर पातूर्डे यांनी मानले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM