तेल्हारा (प्रा.विकास दामोदर )- वांगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मनात्री बु. द्वारा संचालित संस्कार इंग्लिश स्कूल तेल्हारा येथे चिमुकल्या मुलांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी दि. 30/01/2020ते 31/01/2020 हे दोन दिवशीय वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
आजच्या खाजगी शिक्षण व्यवस्थेत सर्वसामान्य गोरगरिबांची मुले देखील इतर श्रीमंतांच्या मुलासारखी शिकली पाहिजे यासाठी ज्योतिबा फुले व सावित्रीचा वसा जपत संस्थेचे अध्यक्ष अविनाश मनतकार व सौ.नायनाताई मनतकार अत्यंत अल्पशा शुल्कावर विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी इतर महागड्या शाळांसारखे उपक्रम देखील राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणजे स्नेह संमेलन.
वार्षिक स्नेह संमेलनाचे उदघाटक सौ नयनाताई मनतकार यांचे हस्ते सौ. मोनिका प्रदिप वाघ यांच्या उपस्थितीत पार पडले तर लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी बालसंस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले यामधे लहान लहान मुलांनी खूप सुंदर प्रकारे आपली कला सादर केली. तदनंतर विद्यार्थ्यांना श्री. संदीप झाडोकार, नयनाताई मनतकार यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी सौ.मोनिका वाघ (मुख्याध्यापिका )यांच्या मार्गदर्शनात मानकर सर, गिऱ्हे सर तथा सर्व शिक्षिका सौ. मोरे मॅडम, सौ.झाडोकार मॅडम, सौ. शिंगोकार मॅडम, सदाफळे मॅडम, तथा कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM