अकोला (प्रतिनिधी)- शहरातील मोबाईल सेवा आठवड्याभरापासून कोमात गेली आहे. महापालिकेनं अनधिकृत मोबाईल टावर्स सिल केल्यानं शहरात सर्वच मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कची समस्या सुरु झाली. यामुळं संतप्त मोबाईलधारकांनी मोबाईल फोडत अकोला महापालिकेत आंदोलन केलं.
अकोला शहरातील 228 टॉवर पैकी 220 टॉवर अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महापालिका प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करत शहरात सदर टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला कोट्यवधींचा फटका बसत आहे. दरवर्षी संबंधित मोबाइल टॉवरचे नूतनीकरण करणे अनिवार्य आहे. मात्र मोबाईल कंपन्यांनी ते केले नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाचा 6 कोटी 60 लाखांचा महसुल बुडाला.
त्याच प्रमाणे शहरात विविध कंपन्यांनी महापालिकेच्या परवानगीविना मोठ्या प्रमाणात केबल ओढले आहेत. कुंभकर्णी झोपेत असलेल्या महापालिकेने आता त्यांचे हे केबल तोडून जप्त करण्याचे तसेच मोबाईल टॉवरवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात अनधिकृतरित्या टाकण्यात आलेली केबल महापालिकेने जप्त केली आहे. या कारवाईमुळे अकोला शहरातील अनेक भागात मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे. याचा ग्राहकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. यामुळं आज संतप्त मोबाईलधारकांनी महापालिकेत मोबाईल फोडत आपला रोष व्यक्त केला.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/I2tvT2AFMKnDagGDyS56n4