मुंबई : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी २४ जानेवारीला महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.
बंदला मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचा दावा आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याला विरोध करतानाच, आंबेडकर यांनी देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका केली. देश आर्थिक संकटातून जात असताना लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना, हा कायदा लागू करणारच, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मांडत आहेत, हे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र बंदमध्ये ५० हून अधिक राजकीय, सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/I2tvT2AFMKnDagGDyS56n4