अकोट (देवानंद खिरकर) – दि.19/01/2020 रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघ अकोला जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील,सर्व तालुक्यातील पत्रकार बंधूंनि या बैठकीला उपस्थित रहावे. यामध्ये अकोला जिल्हा अध्यक्ष नियुक्ती करणे,प्रत्येक तालुक्यातील तालुका अध्यक्ष नियुक्ती करणे व जिल्ह्यातील आणि तालुक्यातील काही पद जाहिर करणे आहे, तरी पत्रकार बंधूंनि 2 फोटो, फी, पेपर ओळखपत्र, आधारकार्ड झेरॉक्स घेऊन येणे, वरील बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघ केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने साहेब, केंद्रीय उपाध्यक्ष युसूफभाई खान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबाप्पू देशमुख, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रा.रविंद्र मेंढे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष जानवे,प्रदेश सचिव शकील अहमद, विदर्भ प्रदेश अध्यक्ष संजय कदम, विक्रम सायानी, अकोला जिल्हा उपाध्यक्ष देवानंद खिरकर,प्रदेश प्रसिद्ध प्रमुख दिनेश भटकर,हे हजर राहणार आहेत तरी सर्वांनी वेळेवर हजर रहावे.
बैठकीचे स्थळ सार्वजनिक बांधकाम विश्राम गृह नविन बस स्थानका जवळ अकोला,महाराष्ट्र
वेळ सकाळी 11.00 वाजता ठरले आहे.