अकोला (प्रतिनिधी)- शहर वाहतूक शाखा अकोला तर्फे रास्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने वेग वेगळ्या प्रबोधनात्मक व धडक मोहिमा सुरू असून,रस्त्या वरील अपघात कमी करण्या साठी वेग वेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषणगाने नेत्र दोष असल्याने किंवा नजर कमी झाल्याने होणारे अपघात टाळता यावे म्हणून नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन आज दिनांक 16।1।20 रोजी पोलिस मुख्यालयातील मनोरंजन सभागृहात आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरा मध्ये अकोल्यातील प्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉक्टर शिरीष थोरात व त्यांचे चमू ने सेवा दिली. सदर शिबिराचे उदघाटन पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांनी करून सुरक्षित वाहन चालविण्या साठी शरीर सुद्धा स्वस्थ लागेल व ह्या साठी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून पोलीस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी हक्काची व तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून लवकरच पोलीस हॉस्पिटल कार्याणवीत करणार असल्याचे सांगितले.
डॉक्टर शिरीष थोरात ह्यांनी फक्त शिबिरा पुरतेच मर्यादित राहणार नसून आजच्या तपासणीत ज्यांना पुढील उपचार किंवा ओपेरेशन ची गरज आहे. त्यांना कार्ड देण्यात येईल व वर्षभर त्यांचा उपचार त्यांचे स्वतः चे हॉस्पिटल मध्ये विनाशुल्क करण्यात येईल असे जाहीर केले. सदर नेत्र चिकित्सा शिबिरात पोलिस वाहन चालक, अकोल्यातील स्कुल बस चालक, वाहतूक कर्मचारी अश्या एकूण 225 लोकांची नेत्र तपासणी करण्यात येऊन औषधे देण्यात आली व त्या पैकी पुढील तपासणी व उपचार आवश्यक असलेल्या 92 रुग्णांना कार्ड देऊन डॉक्टर थोरात ह्यांचे नेत्र चिकित्सलया मध्ये त्यांना वर्षभर पुढील उपचार विनामुल्य करण्यात येणार आहे. सदर शिबिराचे उदघाटन कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, डॉक्टर शिरीष थोरात, डॉक्टर आशिष ठाकरे गृह पोलिस अधीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक गजानन शेळके, राखीव पोलिस निरीक्षक गुळसुंदरे उपस्थित होते. सदर शिबीर यशस्वी करण्या साठी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, डॉक्टर आशिष ठाकरे व वाहतूक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.