हिवरखेड (धीरज बजाज)- हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडगाव बु. येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुशंगाने उद्भवलेल्या राजकीय वादामुळे परस्पर विरोधी तक्रारी हिवरखेड पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपींचे अटकसत्र सुरू केले होते.
पोलिसांनी धडक कारवाई करत राजकीय क्षेत्रात वजनदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक प्रस्थापितांसहित विविध कलमान्वये गुन्हे दाखल असलेल्या अनेक आरोपींना अटक केली ज्यामध्ये गोपाल मधुकर कोल्हे, गुलाम अहमद खॉ गुलाम वसिब खॉ, राजीक खॉ रहिम खॉ, नासिर खॉ उर्फ भोल्या दस्तगीर खॉ, संतोष गोविंदराव वैतकार, किशोर राधेश्याम मुंदडा, मनोहर नामदेव केणेकर, सतिष महादेव देवळे, दिपक भाऊराव वाघमोडे, दिनेश महादेव खंडेराव श्रीकृष्ण ज्ञानदेव मानकर संजय रामदास राजनकर श्याम मधुकर कोल्हे नंदकिशोर अमृतराव मानकर श्याम प्रमोद ताठे प्रविण अशोक राजनकार अशा एकूण सोळा आरोपींना अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 16 आरोपींपैकी श्रीकृष्ण ज्ञानदेव मानकर संजय रामदास राजनकर नंदकिशोर अमृतराव मानकर श्याम प्रमोद ताठे प्रविण अशोक राजनकार ह्या पाच आरोपींना 10 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास ठाणेदार आशिष लवंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलीस करीत आहेत. ह्या मोठ्या राजकीय प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणांमध्ये अनेक मोठ्या पक्षांच्या राजकीय प्रस्थापितांचा समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.