तेल्हारा(प्रतिनिधी)- माऊली ज्ञानपीठ इंग्लिश स्कुल तेल्हारा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्ष स्थानी से.ब.प्राथ.चे मुख्याध्यापक रेवस्कर सर ,प्रमुख अतिथी भाऊसाहेब राजनकार चे मु.अ. घोगले सर , भारत विद्यालय पंचगव्हान चे शिक्षक माठे सर होते.
यावेळी सावित्रीबाई फुले च्या फोटोचे पूजन करण्यात आले. नर्सरी ची विद्यार्थिनी कु.आराध्या गव्हाळे हिचे सावित्री च्या वेशभूषेत औक्षवण करण्यात आले.यावेळी कॉन्व्हेंट वर नवनियुक्त झालेल्या पवार मॅडम आणि तायडे मॅडम यांचे स्वागत करण्यात आले. तायडे मॅडम यांनी कॉन्व्हेंट मधील विध्यार्थ्यांना उपक्रमशील बनवत कॉन्व्हेट ला प्रगती पथावर नेण्याचे यावेळी सांगितले. रेवस्कर सर घोगले सर यांनी मार्गदर्शन करत कॉन्व्हेंट ला नावारूपास आणण्यासाठी नेहमी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माऊली ज्ञानपीठ तर्फे स्व.भाउसाहेब राजनकार विद्यालयाला स्मार्ट टीव्ही सप्रेम भेट देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्राचार्या राजनकार मॅडम यांनी तर आभार पवार मॅडम यांनी मानले.