तेल्हारा (विकास दामोदर)- तेल्हारा येथून जवळच असलेल्या मौजे घोडेगाव येथील अर्जदार रब्बानी खान मोहम्मद खान यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तेल्हारा येथे सावकारी अंतर्गत प्रकरण दाखल केले होते व सदरच्या प्रकरणात गैर अर्जदाराचे पुरावे न होता अर्ज मंजूर होऊन वरील गैरअर्जदार यांना सावकार सिद्ध झाला होता परंतु सिद्ध झाले होते परंतु वरील गैरअर्जदार यांनी सदर तक्रारी विरुद्ध अपील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांचे कार्यालयात 18 /2 प्रमाणे दाखल केली होती व सदर कार्यालयात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या कार्यालयात 18/2 प्रमाणे पुराव्यानिशी प्रकरण कार्यवाही चालली होती.
सदर अपीलअर्जदार रब्बानी खान यांनी ठोस पुरावे दाखल न केल्याने सदरचे प्रकरण सावकारांचे जिल्हा उपनिबंधक साहेब अकोला यांनी दिनांक 13 नोव्हेंबर 2019 रोजी निकालात काढले व अर्जदार रब्बानी खान मोहम्मद खान यांची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तेल्हारा येथे दाखल केलेली तक्रार बेकायदेशीर असल्याने व सदर तक्रारीबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने सदर अर्जदार रब्बानी खान मोहम्मद खान यांनी दाखल केलेली तक्रार विशेष जिल्हा निबंधक साहेब सहकारी संस्था अकोला यांनी सदरची तक्रार खारीज करण्याचे आदेश दिले आहेत व खोट्या सावकारी प्रकरणातून शे. बरकत शे. दाऊद, देवकरण भगवानदास चौबे, शेख शफीक शेख बरकत व शेख अतीक शेख बरकत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे सदर प्रकरणात गैरअर्जदार शेख बरकत शेख दाऊद, देवकरण भगवानदास चौबे, शेख शफीक शेख बरकत, शेख अतीक शेख बरकत यांच्यातर्फे ॲड. सुधीर काणे व ॲड. दिपक भाकरे यांनी काम पाहिले.